Meaningful story in marathi मित्रांनो आज आपण “चूक नेमकी कोणाची ?” ही Story मराठी मध्ये पाहणार आहोत तरी ही Story तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण Story ला सुरूवात करूयात.

चूक नेमकी कोणाची ?

Meaningful story in marathi

रेणू आजदेखील नेहमीप्रमाणे एकटीच ऑफिसमधून घरी चालली होती. परंतु, आज ऑफिसमधील कामांमुळे तिला घरी जाण्यासाठी खूप उशीर झाला होता आणि त्याचे भान ठेवूनच ती भरभर पावले उचलत घराच्या दिशेने चालत होती. तिने एकनजर अवतीभोवती पाहिले, तर तिच्या लक्षात आले कि सर्वत्र काळोखा पसरला होता. रात्र अमावस्थेची होती आणि रस्त्यावर दुसरे कोणीही नव्हते.

रस्त्याने चालतानादेखील रेणूच्या मनात घरचेच विचार होते. केव्हा ती घरी पोहोचेल आणि आई केव्हा तिची विचारपूस करील, "बाळा, आज घरी यायला एवढा उशीर का केलास?" याची तिला खूप आतुरता होती. चालता चालता रेणूच्या लक्षात आले कि तिच्या समोर एक माणूस भीक मागत होता. परंतु, तिने त्याकडे दुर्लक्ष केले आणि ती घराकडे जाण्यात मग्न झाली. रेणू जसजशी त्या भिकार्या जवळ जावू लागली, तसतसा तो भिकारी आणि त्या सभोवतालचा परिसर रेणूला स्पष्ट दिसू लागला.

Meaningful story in marathi
Meaningful story in marathi

रेणू ज्या रस्त्याने घरी चालली होती, त्याच रस्त्याच्या डाव्याबाजूला बसून तो भिकारी भिक्षा मागत होता. त्याच्या समोर एक चारचाकी गाडी उभी होती आणि त्यातून दोन व्यक्ती बाहेर आल्या गाडी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू लागल्या. कदाचित, जास्त आंतर कापल्यामुळे गाडी बंद पडली असावी. त्या गाडीतील व्यक्तींना हा भिकारी भिक्षा मागू लागला, हे रेणूच्या लक्षात आले. 'Meaningful story in marathi'

आणखी पुढे गेल्यावर रेणूला जाणवले कि तो भिकारी तोंडाने काहीच बोल नव्हता. तो त्याच्या हातातील कटोरी रस्त्यावर आदळून लोकांना स्वत:कडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा दुस-या हाताने हातवारे करत भिक्षा मागायचा, ही त्याची भिक्षा मागण्याची शैली असावी. मात्र, त्या गाडीतील व्यक्तींनी भिका-याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी आपली गाडी दुरुस्त केली ते गाडीत बसून निघून गेले. भिका-याला वाटले कि आजदेखील त्याला उपाशीच रहावे लागणार. त्यामुळे त्याने कटोरी वाजवणे बंद केले. मात्र, तीव्र भुकेमुळे त्याच्या डोळ्यातून आसवे वाहू लागली.

त्या भिका-याच्या अंगावरील फाटके कपडे, वाढलेली दाढी, अक्राळ-विक्राळ रूप धारण केलेले केस आणि चप्पल नसल्यामुळे ठे लागल्याने डाव्या पायाच्या अंगठ्यातून वाहणारे रक्त हे सर्व पाहून रेणूला त्याच्यावर खूप दया आली. त्याच्याकडे पाहताच लक्षात येत होते कि तो 2-3 दिवसांपासून उपाशी होता.

आईने शाम्पू खरेदीसाठी दिलेली पर्समधील 50 रुपयांची नोट त्या भिका-याची भूक भागवण्यासाठी अधिक उपयोगी ठरेल असे रेणूला वाटले. म्हणून ती त्याच्या जवळ गेली तिने 50 रुपये त्याच्या कटोरीमध्ये ठेवले आणि स्मितहास्य करत म्हणाली, काका, माझ्याकडे जास्त नाहीत. मात्र, तुमच्या रात्रीच्या जेवणाची सोय नक्की होईल”. भिका-याला पैसे देवून रेणू पन्हा आपल्या घराकडे चालू लागली. रात्र फार झाली होती आणि रस्त्यावर दुसरे कोणी दिसतही नव्हते. मात्र, जेव्हा रेणूला जाणीव झाली कि तो भिकारी लंगडत-लंगडत तिच्या मागे-मागे येत होता, तेव्हा तिच्या भितीला सिमाच राहिली नाही. तिने तिरकस नजरेने हळूच मागे पाहिले, तर तो भिकारी हातवारे करत तिच्या मागे-मागे येत होता. रेणूने आपल्या चालण्याचा वेग वाढवला आणि ती मदतीसाठी अवतीभोवती पाहू लागली. मात्र, त्या रस्त्यावर तिला कोणीही दिसले नाही.

story in marathi

भिकारी तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिच्यामागेधावू लागला. रेणूही स्वतःच्या बचावासाठी जोराने धावू लागली. तो भिकारी इतका भयानक दिसत होता कि रेणूला मागे पहाव देखील वाटत व्ह. रस्त्यावरही कोणी नव्हते. त्यामुळे ती ओरडून कोणाला मदतदेखील मागू शकत व्हती. भिका-याला भिक देवून फार मोठी चूक झाल्याची जाणीव तिला होवू लागली.

धावता-धावता आईने आपल्या बचावासाठी पर्समध्ये ठेवलेल्या सुरीची आठवण रेणूला झाली. तिचा धावण्याचा वेग कमी होवू लागला, तसा तो भिकारी तिच्या जवळ येवू लागला. तो एकदाचा रेणूच्या जवळ आला आणि त्याने तिला थांबवण्यासाठी तिच्या खांद्यावर हात टाकला, तोच रेणून पर्समधील सुरीने त्याच्या गळ्यावर वार केला. घायाळ झालेला तो भिकारी ओरडला धप्पदिशी रस्त्यावर कोसळला. त्याच्या गळ्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. मात्र, रेणू तेथे थांबता धावत-धावत पुढे गेली एका झाडाच्या पाठीमागे लपून त्याच्याकडे पाहू लागली.

story in marathi

त्या भिका-याच्या आवाजाने हळहळू लोक तेथे जमू लागले. थोड्याच वेळात एक व्यक्ती मोठ्याने रडू लागली. त्याच्या रडण्यावरून स्पष्टपणे लक्षात येत होते कि त्या भिका-याने आपला शेवटचा श्वास घेतला होता आणि ती व्यक्ती भिका-याची जवळची नातेवाईक होती. हे सर्व पाहून रेणू आणखी घारली आणि रस्त्याच्या कडेला बसून रडू लागली.

तेवढ्यात अचानक त्या व्यक्तिची नजर रेणूकडे गेली. Meaningful story in marathi तो रेणूजवळ आला आणि त्याला तिच्या अंगावर त्या भिका-याचे रक्त सांडलेले दिसले. त्याने थोडा वेळ विचार केला रेणूच्या हातात एक नेकलेस दिला आणि तो रडत रडत रेणूला म्हणाला, "माझा भाऊ मुका होता. मात्र, खूप प्रामाणिक होता". नंतर तो भावाच्या मृतदेहाजवळ जावून रडत बसला. नेकलेस पाहून रेणूच्या लक्षात आले कि, कटोरीमध्ये 50 रूपये टाकण्यासाठी ती वाकली असता तिच्या गळ्यातील रत्नजडित, मौल्यवान हार तिथेच पडला होता आणि हार परत करण्यासाठी तो भिकारी रेणूला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. बिचारा मुका असल्यामुळे काही बोलू शकला नाही आणि दुर्दैवाने त्याला आपला जीव गमवावा लागला.

परंतु, रेणू आता पश्चात्तापाव्यतिरीक्त दुसरे काहीच करू शकत नव्हती.  "Meaningful story in marathi" मृतदेहाजवळ जमलेल्या जमावाला जेव्हा ही पूर्ण घटना समजली, तव्हा सर्वांना एकच प्रश्न पडला- चूक नेमकी कोणाची ?

 

तात्पर्य :- कोणतीही कृती करण्यापूर्वी विचार करायलाच हवा.